अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अद्याप जीवंत, मृत्यूची पसरली अफवा

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अद्याप जिवंत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अद्याप जीवंत, मृत्यूची पसरली अफवा
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अद्याप जिवंत असून त्याच्यावर भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)मध्ये उपचार सुरू आहेत. ANI नं यासंदर्भातील वत्त दिलं आहे.  

शुक्रवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नवी दिल्ली इथं कोरोनाव्हायरसमुळे छोटा राजनचं निधन झालं अशी बातमी पसरली. पण काही वेळातच ही बातमी खरी नसल्याचं समोर आलं.

यासंदर्भात ANI नं ट्विट केलं की, AIMS कडून मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अद्याप जिवंत आहे. कोरोना उपचारासाठी त्याला AIMS मध्ये दाखल केलं आहे. 

राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनला २ एप्रिलला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. २०१५ मध्ये इंडोनेशियातून अटक झाल्यानंतर त्याला नवी दिल्लीतील उच्च सुरक्षा तिहार तुरूंगात ठेवण्यात आलं होतं.

छोटा राजनचा जन्म मुंबईच्या चेंबूर भागात टिळक नगर वस्तीत झाला. शाळा सोडल्यानंतर छोटा राजननं मुंबईत चित्रपटाची तिकिटं ब्लॅक करणं सुरू केलं. यादरम्यान, तो राजन नायर टोळीत सामील झाला. अंडरवर्ल्डच्या जगात नायरला 'बडा राजन' म्हणून ओळखलं जात होतं.

कालांतरानं, राजेंद्र (छोटा राजन) बडा राजनचा जवळचा झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर तो टोळीचा मुख्य झाला. छोटा राजन फरार होता, तेव्हा त्याच्यावर भारतात ६५ पेक्षा जास्त फौजदारी खटले दाखल झाले होते. ही प्रकरणे बेकायदेशीर वसुली, धमकी, प्राणघातक हल्ला आणि खुनाच्या प्रयत्नांचे होते.

त्याच्यावर २० हून अधिक लोकांचा खून केल्याचा आरोप होता. पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा