दाऊदचा हस्तक तारिक परवीनला अटक

सारा जमीन घोटाळ्यातील आरोपी तारिक परवीन याला ठाणे खंडणी पथकाने नुकतीच अटक केली. ठाणे खंडणी पथकाने धडक कारवाई करत तारिक परवीनला मुंबईच्या आझादनगर परिसरातून अटक केली.

दाऊदचा हस्तक तारिक परवीनला अटक
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीन याला ठाणे खंडणी पथकाने नुकतीच अटक केली. मुंब्रातील एका हत्येच्या गुन्ह्यात पोलिस तारिकच्या शोधात होते. याशिवाय १९९३ मुंबई बॉम्ब स्फोटमध्येही तारिकचे नाव होतं.


सारा जमीन घोटाळ्यातील आरोपी

तारिक हा सारा जमीन घोटाळ्यातील आरोपी आहे. ठाणे खंडणी पथकाने धडक कारवाई करत तारिक परवीनला मुंबईच्या आझादनगर परिसरातून अटक केली.


अखेर अटक

मुंब्राच्या एक हत्या प्रकरणानंतर तारिक परवीन फरार होता. तारिकला पकडण्याचा प्रयत्न अनेकदा पोलिसांनी केला. मात्र वेळोवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देत तारिक पळ काढायचा. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि फारूख टक या दोघांच्या अटकेनंतर डी गँगला हादरा बसला असताना तारिकची अटक हे मोठं यश मानलं जात आहे.


हेही वाचा - 

दाऊदच्या मुंबईतील साम्राज्याला जबरदस्त हादरा!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा