पोयसरमध्ये बेरोजगार तरूणाची आत्महत्या

  Kandivali
  पोयसरमध्ये बेरोजगार तरूणाची आत्महत्या
  मुंबई  -  

  नोकरी मिळत नसल्याने निराश झालेल्या एका 29 वर्षांच्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कांदिवलीतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चंदन झा (29) असे या तरूणाचे नाव असून तो पोयसर येथे आई-वडिल आणि भावंडांसोबत राहात होता.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान टीव्ही पाहात बसला होता. त्यानंतर त्याची आई पाणी भरण्यास घराबाहेर गेल्यानंतर त्याने दार आतून लावून घेतले आणि पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. आईने बराच वेळ दरवाजा वाजवूनही त्याने दार उघडले नाही. त्यानंतर कामावरून परतलेल्या त्याच्या वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर त्यांना पंख्याला लटकलेला चंदनचा मृतदेह दिसला.

  चंदनचा मोठा भाऊ नोकरी करत असून तो आणि त्याचा लहान भाऊ घरीच होते. अनेकदा प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसल्याने चंदन निराश होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.