डायपर्समध्ये सापडलं १८ लाखांचं सोनं!


डायपर्समध्ये सापडलं १८ लाखांचं सोनं!
SHARES

हवाई गुप्तचर विभागाची तसंच कस्टमची नजर चुकवण्यासाठी सोन्याची तस्करी करणारे नेहमीच नवनवीन शक्कल लढवतात. हे सोनं ते कुठं लपवतील याचा काही नेमच नसतो. रविवारी पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला.


डायपर्समध्ये लपवलं सोनं

यावेळी तस्करानं तब्बल १८ लाख रुपये किंमतीचं सोनं चक्क डायपर्समध्ये लपवलं होतं. याप्रकरणी पुणे कस्टम विभागानं मुंबईतील रहिवासी असलेल्या या तस्कराला अटक केली आहे. या प्रवाशाची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून तपास सुरू असल्याचं कस्टम विभागाकड़ून सांगण्यात आलं आहे.


सोन्याची किंमती १८ लाखांच्या घरात

रविवारी दुबईहून येत असलेला हा प्रवासी पुणे विमानतळावर उतरला. यावेळी हवाई गुप्तचर विभागानं त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्यात ४८ डायपर्स होते. त्यानंतर स्कैनरने तपासणी केली असता त्यात काही धातू असल्याचं आढल्यानंतर कस्टमने त्या डायपर्सची निरखून पाहणी केली असता या सगळ्या डायपर्सची बटने ही सोन्याची असल्याचं समजलं. यावेळी पकडण्यात आलेल्या सोन्याची किंमती ही १८ लाख रुपयांच्या घरात असल्याचं कस्टम विभागानं सांगितलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा