मरीन ड्राइव्हवर आढळला महिलेचा मृतदेह


मरीन ड्राइव्हवर आढळला महिलेचा मृतदेह
SHARES

मरीन ड्राइव्ह चैापाटीवर गुरुवारी दुपारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खऴबऴ उडाली अाहे. गुरुवारी दुपारी हा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं. अद्याप या महिलेची ओऴख पटली नसून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली आहे. या महिलेची ओळख पटवण्यासाठी तिच्या नातेवाइकांचा शोध घेतला जात आहे.


दगडात आढळला मृतदेह

गुरूवारी दुपारी ४.१५ वाजताच्या दरम्यान मरीन ड्राइव्ह चैापाटीवरील दगडांमध्ये हा मृतदेह आढळून आला. या महिलेचं वय अंदाजे ४० वर्षे सांगण्यात येत आहे. मृतदेह जी.टी. रुग्णालयात नेले अाहे. मरीन ड्राइव्हसारख्या हाय प्रोफाइल लोकवस्तीच्या परीसरात कुजलेल्या स्थितीत मृतदेह सापडल्याने परिसरात खऴबऴ उडाली आहे.



हेही वाचा -

संभाजी भिडेंविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार

मुंबईत वाढले हुंडाबळीचे गुन्हे, ११ महिलांचा बळी



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा