मुंबईत वाढले हुंडाबळीचे गुन्हे, ११ महिलांचा बळी

बदलत्या मानसिकतेनुसार शहरी भागातही हुंडाबळीच्या गुन्ह्यांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वर्षी महिलांचा छळ केल्याप्रकरणी मुंबई शहर पोलिसांकडे २०० गुन्हे दाखल झाले होते. विशेष म्हणजे दर वर्षाला हा आकडा वाढतच चालला आहे.

मुंबईत वाढले हुंडाबळीचे गुन्हे, ११ महिलांचा बळी
SHARES

हुंड्यासाठी छळ करून विवाह‌ितेला आत्महत्येस प्रवृत्त करणं किंवा तिचा बळी घेण्याचे प्रकार मुंबईत वाढीस लागले आहेत. गेल्या वर्षातच हुंड्यासाठी महिन्याकाठी २ विवाहितांना आपल्या प्राणास मुकावं लागलं होतं. चालू वर्षात देखील हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसून मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात हुंडाबळीचे २०० गुन्हे आतापर्यंत नोंदवण्यात आले आहेत. यापैकी ५४ गुन्ह्यांत आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.


११ महिलांचा बळी

विशेष म्हणजे ज्या महिलांपर्यंत मदत पोहोचू शकली नाही. अशा २ महिलांची हत्या करण्यात आली, तर ९ महिलांना आत्महत्येचा पर्याय निवडून स्वतः चं आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.


कारण काय?

लग्नात मानपान दिला नाही, हुंडा कमी दिला, गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणले नाहीत, चरित्र्यावर संशय अशा असंख्य कारणावरून विवाहितेचा मानसिक आणि शा‌रीरिक छळाच्या घटना दररोज घडतात. यातील काही घटना पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचतात, तर काही सामंजस्याने मिटवल्या जातात.



मानसिकतेत बदल

असे प्रकार खेडोपाड्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आतापर्यंत शहरी माणसांचा समज होता. मात्र बदलत्या मानसिकतेनुसार शहरी भागातही हुंडाबळीच्या गुन्ह्यांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वर्षी महिलांचा छळ केल्याप्रकरणी मुंबई शहर पोलिसांकडे २०० गुन्हे दाखल झाले होते. विशेष म्हणजे दर वर्षाला हा आकडा वाढतच चालला आहे.


गेल्या वर्षी किती गुन्हे?

२०१७ मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील कलम ४९८ नुसार २३० गुन्हे दाखल झाले होते. २०१८ या वर्षभरात हुंड्यांसाठी आग्रही असलेल्या सासरच्या त्रासाला कंटाळून ९ विवाहितांनी आत्महत्या केली असून हुंड्यासाठी २ विवाहितेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षी २०१६ मध्ये वर्षभरात ६०२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामध्ये २८ महिलांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला असून अत्याचाराला बळी पडणाऱ्या विवाहितांची संख्या ८ इतकी आहे.

पोलिसांकडून उपलब्ध आकडेवारीवरून गेल्या वर्षात फक्त हुंड्यासाठी महिन्याकाठी २ विवाह‌िता मृत्युमूखी पडल्याचे दिसतं. निर्भयाप्रकरणानंतर विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा अंमलात आणला गेला. मात्र तरी ही अशा प्रकारचे गुन्हे कमी होण्याचे नाव घेत नसून शहरी भागात हे गुन्हे वाढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.



हेही वाचा-

दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा होणार लिलाव

दारूच्या नशेत पोलिसांना मारहाण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा