दारूच्या नशेत पोलिसांना मारहाण


दारूच्या नशेत पोलिसांना मारहाण
SHARES

मिरा रोडमध्ये दारुच्या नशेत असलेल्या काही लोकांनी चक्क पोलिसांनाच बंधक बनवून मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये तीन पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये दोन तरुणींचाही समावेश असून त्या दारुच्या नशेत असल्याचं आढळून आलं. या पोलिसांना वाचवण्यासाठी खुद्द वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना सोडवलं.


संपूर्ण प्रकार

या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह 14 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरा रोड मधील समृद्धी अपार्टमेंटमध्ये दारू पार्टी सुरू असून मोठ्या आवाजत म्यूझिक सुरू होतं. मात्र तिथल्या रहिवाशांनी ते थांबण्याचा प्रयत्न केला असता दारुच्या नशेत असलेल्या तरुण-तरुणींनी त्यांना धमकावलं. त्यामुळे याप्रकणी त्यांनी कंट्रोल रुमला संपर्क करून तक्रार केली. त्यानुसार 3 पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

त्यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जाब विचारला असता दारूच्या नशेत असलेल्या तरुण तरुणींनी त्यांच्याशी वाद घातला. त्यांनी इतक्यावरच न थांबता पोलिसांना आत ओढलं आणि दोन तासापर्यंत बांधून ठेवत मारहाण केली. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत पोलिसांची सुटका केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा