युपीतला आरोपी नाला सोपाऱ्यामध्ये बनला साखळी चोर

 Nallasopara
युपीतला आरोपी नाला सोपाऱ्यामध्ये बनला साखळी चोर
Nallasopara, Mumbai  -  

नालासोपारा परिसरात महिलांच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सय्यद उस्मान असं या आरोपीचं नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख 70 हजार रुपयांच्या चोरीच्या सोन्याच्या वस्तू हस्तगत केल्या आहेत. हा चोरटा नशा करण्यासाठी चोरी करत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आरोपीवर युपीमधील इंदिरापुरीमध्ये अपघात प्रकरणी गुन्हा दाखल असून, तो जामिनावर आहे. युपीमधील गाजियाबाद जिल्ह्यामध्ये इंदिरापुरम येथे 28 जानेवारीला एका ऑडी कारचा अपघात झाला होता. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गाडीचा मालक मनिष रावत आणि चालक इशाक याच्यासोबत 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर मालक मनिष रावत पोलिसांना सापडला नाही. या प्रकरणात इशाक नावाच्या इसमाला आरोपी ड्रायव्हर दाखवून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र हा इशाक दुसरा तिसरा कुणी नसून सय्यद उस्मान असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांनी दिली.

Loading Comments