वांद्रे गर्दी प्रकरणी अटक केलेल्या दुबेची पोलिस कोठडीत रवानगी


वांद्रे गर्दी प्रकरणी अटक केलेल्या दुबेची पोलिस कोठडीत रवानगी
SHARES

स्वत:ला उत्तरभारतीय नागरिकांचा नेता म्हणवून घेणाऱ्या विनय दुबेला मंगळवारी पोलिसांनी वांद्रे येथील कामगारंानी केलेल्या गर्दीस कारणीभूत म्हणून  वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

देशात बुधवारी संपणाऱ्या  लॉकडाउनमध्ये वाढ झाल्याने संयम सुटलेल्या उत्तर भारतीय कामगारांनी मंगळवारी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर संताप व्यक्त करत एकच गर्दी केली. खायला अन्न नाही, हाताला काम नसल्यामुळे या कामगारांचा संयम सुटल्याचे पहायला मिळाले. माञ सध्याची परिस्थिती पाहता अशा वेळी ऐवढ्या मोठ्या गर्दीने जमणे म्हणजे कोरोनाला आंमञण देण्यासारखेच झाले. वेळीच त्या वेळी पोलिसांनी परिस्थिती हाताळली. पोलिसांनी वाढीव कुमक मागवून जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. माञ या घटनेमुळे प्रशासन आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. इतकच काय तर नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. विशेष म्हणजे गाड्या सुरू नसताना शहरातील अंतर्गत वाहतूक बंद असतानाही ही गर्दी झाली कशी? या प्रश्नाचा शोध घेत असता पोलीस उत्तर भारतीय महापंचायत संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे पर्यंत पोहोचले. त्याने फेसबुकवर आंदोलनाची हाक दिली होती. 


उत्तर भारतात राहणाऱ्या व कामासाठी मुंबईत आलेल्या मजुरांना आपआपल्या राज्यात पाठवण्यासाठी आंदोलन छेडण्याची घोषणा क्ली होती. १८ तारखेला एकत्र जमून उत्तरप्रदेशच्या दिशेने चालत जाण्याचा निश्चय केला होता. सोशल मिडियावर नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत होता. पोलिस तपासात त्याच्या या आवहानंतरच वांद्रे येथे गर्दी झाल्याचे पुढे आल्यानंतर त्याला  नवी मुंबईतून ताब्यात घेत वांद्रे पोलिसांकडे सुपूर्द केले.  पोलिसांनी त्याच्या विरोधात अफवा पसरवणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे, नागरिकांना एकत्र जमवणे, आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. बुधवारी दुबेला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा