सोनंतस्करांच्या टोळीचा पर्दाफाश

 Pali Hill
सोनंतस्करांच्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई - डीआरआय म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयानं विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी विशेषतः महिलांद्वारे सोन्याची तस्करी करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये फरीदा जुझर हजुरी या महिलेला तब्बल 6 किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी मुंबई विमानतळावर शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. सोन्याच्या या दगिन्यांची किंमत तब्बल एक कोटी 16 लाखांच्या घरात असून हे सोन्याचे दागिने दुबईहून भारतात आणले जात होते.

फरीदा नावाच्या या महिला प्रवाशाकडे मोठ्या प्रमाणात सोनं असल्याची माहिती डीआरआयला मिळाल्यानंतर तिच्या सामानाची झडती घेण्यात घेतल्यानंतर हे घबाड तपास यंत्रणांच्या हाती लागलं. फरीदाच्या चौकशीत ती एका मोठ्या सोनंतस्करीच्या रॅकेटचा हिस्सा असल्याची कबुली तिनं तपास यंत्रणांना दिली. डीआरआयनं वसईची रहिवासी असलेल्या फरीदाला कस्टम्स कायद्यान्वये अटक केली अाहे. या टोळीचा मास्टरमाइंड कोण यासह केलेल्या गुन्ह्यांबाबतही डीआरआयनं तपास सुरू केला आहे.

Loading Comments