भाजी महाग विकल्याने भाजी विक्रेत्याचा खून

मंगळवारी दुपारी दोन्ही आरोपी भाजी खरेदी करण्यासाठी यादवच्या भाजीच्या ठेल्याजवळ गेले. त्यावेळी मटरचा भाव यादवने १० रुपयांनी वाढवून सांगितला. भाजी खरेदीवरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

भाजी महाग विकल्याने भाजी विक्रेत्याचा खून
SHARES

राज्यात अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर वाढलेले असल्याने सर्वसामान्य हैराण असताना आता वाढत्या महागाईने  भाजी विक्रेतेही धास्तावले आहे. याचं कारण म्हणजे महाग भाजी विकणं एका भाजी विक्रेत्याच्या जीवावर बेतलं आहे. बाजारभावापेक्षा १० रुपये जास्त दराने भाजी विकणाऱ्या विक्रेत्याची मानखुर्दमध्ये दोघांनी हत्या केली आहे.  रामखिलान यादव (३०) असं या मृत भाजी विक्रेत्याचं नाव आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अभिषेक धुमाळ (२२), साहिल खराडे (१९) या दोघांना अटक केली आहे.

मानखुर्दच्या साठेनगर येथील बेकरी गल्लीत यादव आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. यादव हा मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळून गेलेल्या सायन-पनवेल हायवेवर भाजी विकतो. मंगळवारी दुपारी दोन्ही आरोपी भाजी खरेदी करण्यासाठी यादवच्या भाजीच्या ठेल्याजवळ गेले. त्यावेळी मटरचा भाव यादवने १० रुपयांनी वाढवून सांगितला. भाजी खरेदीवरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी दोन्ही आरोपींनी यादवला बेदम मारहाण केली. या मारहाणीत यादव जागीच बेशुद्ध झाला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला.

बेशुद्ध यादवला स्थानिकांनी तातडीने जवळील रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान यादवचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हत्येचा गुन्हा नोंदवला. दोन्ही आरोपी आंबेडकरनगरमधील असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.



हेही वाचा -

मौजमजेसाठी ते चोरायचे दुचाकी

पबजीनं घेतला तरूणाचा जीव




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा