वाहनानं चिरडल्यामुळे अजगराचा मृत्यू

 Bhandup
वाहनानं चिरडल्यामुळे अजगराचा मृत्यू
वाहनानं चिरडल्यामुळे अजगराचा मृत्यू
वाहनानं चिरडल्यामुळे अजगराचा मृत्यू
वाहनानं चिरडल्यामुळे अजगराचा मृत्यू
See all

भांडुप - भांडुप कॉम्प्लेक्स परिसरात कारने चिरडल्यामुळे 10 फुटी अजगर जखमी झाल्याची माहिती रॉ प्राणीमित्र संघटनेला मिळाली. लगेचच संस्थेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत अजगराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या टीमनं अजगराला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या तुलसी रेंज अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं. नंतर मृत अजगर मुंबई रेज टेरिटोरीयलच्या ताब्यात देण्यात आला. रात्रीच्या वेळी या परिसरात वन्य जीवांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे वाहनांच्या धडकेत अनेक प्राणी जखमी होतात. महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरात गाड्यांच्या वेगांवर निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याचं शर्मा यांनी या वेळी सांगितलं.

Loading Comments