बुलडाणा अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शनं


SHARE

आझाद मैदान - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मुंबईतील आझाद मैदानात सरकारविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली.

बुलडाणा येथील आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराची घटना, केंद्र सरकारकडून आदिवासी बालविकास केंद्रांना निधी न मिळणे, अन्न सुरक्षा कायदा असताना देखील आदिवासी बालकांचा भूकबळी जाणे, आरोग्य केंद्रात बालरोग तज्ज्ञ नसणं आदी बाबींच्या निषेधार्थ निदर्शनं केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी नागरिकही सहभागी झाले होते. या वेळी विद्याताई म्हणाल्या बुलडाणा जिल्ह्यात घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली आहे. राज्यात अशा घटना वारंवार घडत असताना सरकार मात्र झोपेचं सोंग घेऊन आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या