'या' नराधमाने महिलांच्या पाठीवर हात ठेऊन बनवले 63 अश्लील व्हिडिओ


'या' नराधमाने महिलांच्या पाठीवर हात ठेऊन बनवले 63 अश्लील व्हिडिओ
SHARES

मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातो. पण या दाव्याला छेद देणाऱ्या असंख्य घटना दरदिवशी घडतात. मुली आणि महिलांची छेड काढण्याला 'टाइमपास' समजणारी 'पुरूषी' मानसिकता समाजासाठीच नाही, तर आपल्या कुटुंबीयांसाठीही घातक ठरू शकते. असाच एक प्रकार मुंबईत घडला आहे.


महिलांचे बनवले अश्लील व्हिडिओ

विनय नायर नावाचा एक व्यक्ती कुठल्याही बहाण्याने बॅकलेस ब्लाऊज घातलेल्या महिलांच्या पाठीला हात लावत असे, नंतर अश्लील पद्धतीने व्हिडिओ तयार करून आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करत असे. त्याने आतापर्यंत अशा प्रकारे ६३ व्हिडिओ तयार केल्याची माहिती उघडकीस आली आहे. इतकेच नाही तर त्याचे १,७४४ फॉलोअर्स देखील आहेत.



कसा उघडकीस आला हा प्रकार?

फेसबुक युजर अंगद गुमुराजू यांना ऑनलाईन ब्लाऊज डिझाईन सर्च करत असताना विनय नायरचा प्रोफाईल दिसला. त्यानंतर अंगद यांनी विनय नायरने तयार केलेले व्हिडिओ शेअर करत 'आपण काही दिवसांपूर्वी ब्लाऊजची डिझाईन ऑनलाईन सर्च करत होतो, तेव्हा हा प्रोफाईल दिसला' असे त्याने लिहिले. त्यानंतर विनय नायरचा इंस्टाग्राम अकाऊंट त्वरीत डिलीट करण्यात आला.



हेही वाचा -

रॅगिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल, आरोपींवर गुन्हा दाखल


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा