फेसबुकवरील मैत्री तरुणीला पडली महागात, अश्लील व्हिडिओच्या सहाय्याने आरोपीने लुटले

संबंधीत व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. तो वारंवार तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला.

फेसबुकवरील मैत्री तरुणीला पडली महागात, अश्लील व्हिडिओच्या सहाय्याने आरोपीने लुटले
SHARES

फेसबुकवरील मैत्री भाईंदर येथील तरुणीला चांगलीच महागात पडली. प्रेमाचे नाटक करून आरोपीने तरुणीला कोल्ड्रींग्समधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून तिच्याकडून तब्बल ६ तोळे सोन उकळल्याचे आरोप पीडित मुलीने तक्रारीत केले आहे.  या प्रकरणी पोलिसांनी ३१ वर्षीय तरुणावर गुन्हा नोंदवला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचाः- मुंबई : वृक्ष प्राधिकरणानं इन्फ्रा प्रकल्पांसाठी १,२३४ झाडं तोडण्यास दिली मान्यता

भाईंदरमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय तरुणीची आँक्टोंबरमध्ये फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली होती. दोघांमध्येही फेसबुकवरून बोलणे सुरू झाल्यानंतर एकमेकांचे मोबाईल क्रमांकाची देवाण घेवाण झाली. काही दिवस फोनवर बोलणे झाल्यानंतर दोघांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या. दोघांमध्ये प्रेम झाले. त्यानंतर आरोपीने एकदा शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ तयार करून तरुणाने तिला धमकवण्यास सुरूवात केली. मागणी पूर्ण केली नाही, तर संबंधीत व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. तो वारंवार तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला.

हेही वाचाः- देशाअंतर्गत विमानसेवेत १० टक्के वाढ

तरुणीने आरोपी तरुणाला आतापर्यंत सहा तोळे सोने(तीन लाख किंमतीचे) त्याला दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळून तरूने याप्रकरणी गोराई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३७६,३२८,३८४,५०६ व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव नागरकर यांच्याशी संपर्क साधला असता गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही अधिक तपास करत असल्याचे सांगितले

संबंधित विषय