Advertisement

देशाअंतर्गत विमानसेवेत १० टक्के वाढ

एअरलाइंस आपल्या प्री-कोविड कॅपेसिटीच्या हिशोबानं ८० टक्के फ्लाइट्स ऑपरेट करू शकतील.

देशाअंतर्गत विमानसेवेत १० टक्के वाढ
SHARES

केंद्र सरकारनं देशाअंतर्गत विमानसेवेत १० टक्के वाढ केली आहे. आता विमान सेवा ७० टक्केवरून ८० टक्के झाली आहे. एव्हिएशन मिनिस्टर हरदीप सिंह पुरी यांनी गुरुवारी म्हटलं की, एअरलाइंस आपल्या प्री-कोविड कॅपेसिटीच्या हिशोबानं ८० टक्के फ्लाइट्स ऑपरेट करू शकतील.

पुरी यांनी पुढे सांगितलं की, २५ मे रोजी फक्त ३० हजार लोकांनी हवाई प्रवास केला होता. ३० नोव्हेंबरला हा आकडा २.५२ लाखांवर पोहचला. हा मागील महिन्यातील एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. यामुळेच विमानांची कॅपेसिटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशांतर्गत प्रवास करणाऱ्यां प्रवाशांची संख्या सतत वाढत आहे. यामुळेच केंद्र सरकारनं एअरलाइंस कंपन्यांना ७० टक्के कॅपेसिटीसह उड्डाण घेण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी एव्हिएशन मिनिस्ट्रीनं जूनमध्ये उड्डाणांची संख्या ४५ टक्के वाढवण्याची परवानगी दिली होती.

२ सप्टेंबरला याला वाढून ६० टक्के करण्यात आले. याशिवाय ऑगस्टच्या अखेरपर्यंत एअरलाइन कंपन्यांसाठी अनेक सवलतींची घोषणा केली. यात प्रवाशांना जेवण आणि इतर सवलतींचा समावेश आहे. लॉकडाउननंतर २५ मेपासून देशांतर्गत प्रवासाची सुरुवात झाली होती.



हेही वाचा

एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज - अनिल परब

युलू ई-बाइकला प्रवाशांचा अप्रतिम प्रतिसाद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा