वाढदिवसाच्या पार्टीत मारामारी

  Mumbai
  वाढदिवसाच्या पार्टीत मारामारी
  मुंबई  -  

  दहिसर - वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान आपआपसात मारामारी झाल्याची घटना दहिसरच्या अंबावाडी परिसरातील डीएन दुबे रोडवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतले आहे. मुस्तफा, इरफ़ान, इमरान, इक्बाल, जरीना,रजिया,सायरा आणि किम्मी यांच्यासह त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. ही घटना मंगळवारी 28 तारखेला रात्रीच्या सुमारास घडली. मंगळवारी अंबावाडी येथील डीएन दुबे रोडवर सहलोत परिवार वाढदिवस साजरा करत होता. यासाठी मोठ्याने डीजे देखील लावण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत डीजे सुरु असल्याने काही लोकांनी याबाबत पोलिसांना तक्रार केली. मात्र पोलीस आल्याचे पाहून यातील काहीजणांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. दरम्यान पोलीस हा वाद शांत करायला गेल्यावर कुणीतरी अचानक लाईट बंद केली आणि वातावर अधिक तापले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.