लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

 Girgaon
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

गिरगाव - बहुराष्ट्रीय कंपनीतील एक बड्या अधिकाऱ्याने सहकारी महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्ही.पी.रोड पोलीस ठाण्यात या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवई येथील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सुनील मिश्रा याने सहकारी महिलेला कॉन्फ्ररन्सचे निमित्त करून पुण्याला नेले. तेथे गुंगीचे औषध देऊन त्याने पीडित महिलेवर अत्याचार केला. तसेच पोलिसात तक्रार केल्यास या अत्याचाराचे चित्रिकरण नेटवर व्हायरल करण्याची धमकी त्याने या महिलेला दिली. त्यानंतर पोलिसांनी या महिलेची फिर्याद नोंदवून घेतली नाही. अखेर राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांना निवेदन पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

Loading Comments