SHARE

वडाळा - एका महिलेचा विनयभंग करून पळ काढणाऱ्या आरोपीला तब्बल दोन महिन्यानंतर अटक केलीय. वडाळा टी टी पोलिसांनी ही कारवाई केलीय. आदित्य विश्वामित्र पाठक (19) असं या आरोपीचं नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यानं एका महिलेचा विनयभंग केला होता. याविरोधात महिलेनं पोलिसांकडे तक्रार करताच त्यानं पोबारा केला होता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. मात्र तो दिल्लीला पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

दोन दिवसांपूर्वी आरोपी प्रतीक्षानगर इथल्या त्याच्या घरी आल्याचं पोलिसांना कळलं. त्यानुसार आरोपीच्या घरावर पाळत ठेवून छापा टाकला. पोलिसांना पाहताच आरोपीच्या आईनं त्याला पळून जाण्यास मदत केली. त्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या आईला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान आदित्य परळमध्ये लपल्याचं आईनं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी आदित्यला परळहून अटक केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या