प्रिती झिंटाचा एक्स बॉयफ्रेंड पुन्हा अडचणीत

Malad
प्रिती झिंटाचा एक्स बॉयफ्रेंड पुन्हा अडचणीत
प्रिती झिंटाचा एक्स बॉयफ्रेंड पुन्हा अडचणीत
प्रिती झिंटाचा एक्स बॉयफ्रेंड पुन्हा अडचणीत
See all
मुंबई  -  

प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मात्र यावेळी त्याच्यावर बनावट कागदपत्रे आणि बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. मालाड येथील कुरार गाव परिसरात असलेल्या एफ. ई. दिनशॉ ट्रस्टच्या जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरी केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रस्टी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये उद्योगपती नेस वाडिया, नस्ली वाडिया यांच्यासह मौरीन वाडिया, जहांगीर वाडिया, राजेशा बात्रा, सुकांत केळकर, सुनील जैस्वाल, शिवशंकर झा, राजकुमार मिश्रा आणि व्ही. शहा यांचा समावेश आहे. 

पिंपरीपाडा परिसरात एफ. ई. दिनशॉ ट्रस्टची जागा होती. 1992 मध्ये तक्रारदार अब्दुल वाहिद खान आणि त्याचे भाऊ सैफुल्ला खान यांनी निविदा सादर करून ही जमीन खरेदी केली होती. मात्र व्यवहार झाल्यानंतर अनेक वर्षे उलटूनही ट्रस्टने कन्वेअन्स दिला नव्हता. तसेच, ट्रस्टने दोन्ही भावांच्या नावाने बनावट कागदपत्रे, स्वाक्षरी करून वाढीव पैशांची मागणी केल्याचा आरोप अब्दुल यांनी केला आहे. याविरोधात दोन्ही भावांनी न्यायालयात दाद मागितली असता, बोरीवली न्यायालयाच्या आदेशानुसार कुरार पोलिस ठाण्यात एफ. ई. दिनशॅा ट्रस्टचे ट्रस्टी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

याआधी नेस वाडिया 2014 मध्ये अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्यासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी चर्चेत आला होता. प्रिती आणि नेस रिलेशनमध्ये होते. मात्र आयपीएल मॅचदरम्यान एका वादामुळे हे दोघेही विभक्त झाले होते आणि दोघांमधील भांडण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.