पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

 Malvani
पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

मालाड - पतीच्या जाचाला कंटाळून एका महिलेने शौचालयात आत्महत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी (प.) इथे घडली. मात्र आत्महत्येपूर्वी महिलेने दोषीचं नाव आपल्या हातावर लिहलं होतं. त्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा सापडली.

पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि वारंवार तिचा छळ करणे याप्रकरणी मालवणी पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपी पती जोगींदर गौड (30) याला अटक केली आहे. तसच या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव सरिता गौड (25) असं आहे. ती मालवणी इथल्या पटेलवाडीत आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. सरिता ही मूळची उत्तर प्रदेशातल्या जौनपूर जिल्ह्यात राहणारी होती. ही घटना चार मार्चच्या संध्याकाळी चार वाजता घडली.

Loading Comments