अखेर 'त्या' महिलेचा झाला दुर्दैवी अंत...

 Mumbai
अखेर 'त्या' महिलेचा झाला दुर्दैवी अंत...

मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाला अद्दल घडवणाऱ्या आईचा दुर्दैवी अंत झाला आहे. अमरावती हरिजन 46 नावाच्या या महिलेला तिच्या मुलीवर एकतर्फी प्रेम मरणाऱ्या मुलानेच जाळले होते. त्यात ही महिला तब्बल 95 टक्के भाजली होती. तिने 14 दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिली खरी, पण अखेर गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

वांद्र्याच्या गणेशनगरमध्ये अमरावतीच्या मुलीची तिच्याच परिसरात राहणारा दीपक जठ नेहमी छेड काढत असे. त्याला समजावून देखील त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. शेवटी एकदा अमरावती यांनी या मुलाच्या कानशिलात लगावली.

याचाच वचपा काढण्यासाठी दीपकने 14 एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता अमरावती यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. यात अमरावती 95 टक्के भाजल्या, तर शेजारीण कांता इक्का या 35 टक्के भाजल्या. त्यानंतर उपचारासाठी अमरावती यांना मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अखेर गुरुवारी रात्री अमरावती यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी दीपक जठला वांद्रे पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केले असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Loading Comments