मशिदीच्या भोंग्याचा आवाज कमी करा, ‘त्या’ मुलीला पोलिसांनी पाठवली नोटीस

तिने मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. त्यावरून स्थानिक आणि तिच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मशिदीच्या भोंग्याचा आवाज कमी करा, ‘त्या’ मुलीला पोलिसांनी पाठवली नोटीस
SHARES

मानखुर्दमधील  मशींदीच्या भोंग्या विरोधात आवाज उठवल्याप्रकरणी करिश्मा भोसले या तरुणीला  मानखुर्द पोलिसांनी १४९  (cognisable offences) अंतर्गत नोटीस पाठवली आहे.  काही दिवसांपूर्वी करिश्माने परिसरातील एका मशिदीला भेट दिली होती.  त्यावेळी तिने मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. त्यावरून स्थानिक आणि तिच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


मशिदीवरील भोंद्यावरून करिश्माने तिच्या एक व्हिडिओ ही शेअर करत तिचे मत मांडले होते. त्या व्हिडिओत तिने माझा अजानला विरोध नाही, मी त्या ठिकाणी फक्त भोंग्याचा आवाजा कमी करण्याची विनंती केली. मात्र स्थानिकांनी त्यावरून माझाशी वाद घातला. आमचं कोणाशी शत्रुत्व नाही. अजानला ही विरोध नाही. मात्र  लाऊडस्पिकरवर अजान ज्या आवाजातून होते त्याला विरोध आहे. अशा स्पष्ठ शब्दात तिने तिची भूमिका सोशल मिडियावर व्हिडिओ अपलोड करून व्यक्त केली.  हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर तिला स्थानिकांकडून ही धमकी मिळाल्याचे ही सांगितले. कालांतराने या वादात राजकिय नेत्यांनी ही उडी घेतली.  



वातावरण चिघळत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्बवू नये त्या अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणी करिश्माला  नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये पोलिसांनी करिश्माने मशिदीला भेट देणं अयोग्य आहे. तिला कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास तिने प्रथम पोलिसांकडे यायला हवे, थेट मशिदीत जाऊन लाऊडस्पिकरचा आवाज कमी करण्याची विनंती केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते.  त्या अनुषंगाने पोलिसांनी करिश्मा  आणि तिच्या आईला १४९ व १८८ नुसार नियमांचेपालन न केल्याप्रकरणी नोटीस पाठवली.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा