मिरा रोड : लिव्ह इन पार्टनर ने केली महिलेची हत्या आणि मग शरीराचे तुकडे

लिव्हईनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या पार्टनरने हत्या केली आहे.

मिरा रोड : लिव्ह इन पार्टनर ने केली महिलेची हत्या आणि मग शरीराचे तुकडे
SHARES

दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांड (Delhi Shraddha Walkar Case) प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. अशीच घटना आता मुंबईतील मिरा रोड येथे घडली आहे.

लिव्हईनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या पार्टनरने हत्या केली आहे. हत्या करुन त्याने मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  

एका 32 वर्षीय महिलेचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या महिलेचा खून दोन ते तीन दिवसापूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

इमारतीत राहणाऱ्या शेजाऱ्यांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात माहिती दिली.  

मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाश दिप बिल्डिंग गीता नगर फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये  मध्ये महिलेचा मृतदेह सापडला.

मागच्या तीन वर्षांपासून एक जोडपे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. मनोज सहानी (0वय 53 वर्षे) आणि मृत सरस्वती वैद्य हे दोघे या फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

सरस्वती यांचा मृतदेह हा छोट्या छोट्या तुकड्यात कापले असल्याचे पोलिसांनी सांगितले.  याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला.  सरवस्ती यांचा लिव्ह इन पार्टनर मनोज सहानी याला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येच नेमकं कारण मात्र समजू शकलेले नाही.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा