धक्कादायक! होणाऱ्या नवऱ्यासमोरच धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग

हार्बर मार्गावरील प्रवासात तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक! होणाऱ्या नवऱ्यासमोरच धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग
SHARES

सीएसएमटी ते मस्जिद दरम्यान लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) एका मुलीवर जबरदस्ती करण्याची घटना नुकतीच घडली होती. आता त्यानंतर आणखी एक अशीच घटना समोर आली आहे.  हार्बर मार्गावरील (Harbour Train) प्रवासात तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Mumbai Local Woman Molested News) 

मंगळवारी नेरुळ येथून रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पनवेलला निघालेल्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित महिलेनेच याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. महिलेच्या तक्रारीनुसार रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. निषाद धारीया असं या आरोपीचे नाव आहे. 20 जून रोजी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

नेरूळ-पनवेल लोकलच्या पनवेल दिशेकडील दिव्यांग डब्यामागे असलेल्या जनरल डब्यातून महिला प्रवास करत होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा होणारा पतीदेखील होता. आरोपी निषाद धारिया याने तरुणीला धक्का देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती त्याच्यापासून लांब सावरुन उभी राहिली. मात्र, बेलापूर ते खारघरपर्यंत वारंवार तो शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत होता. 

अखेर त्याचा त्रास असह्य होऊन सदर तरुणीने पनवेल रेल्वे पोलिस गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ याबाबत कठोर पावलं उचलत धारियाला अटक केली आहे. 

काही दिवसांपूर्वी मुंबई लोकलमध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. 40 वर्षांच्या आरोपीने धावत्या ट्रेनमध्येच पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.  छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मस्जिद स्थानकांदरम्यान सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी हा प्रकार घडला होता. मस्जिद स्थानकात ट्रेन आल्यानंतर तरुणीने आरडा-ओरडा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. 



हेही वाचा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : हॅरिटेज वास्तूचे विद्रुपिकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दादरमध्ये सापडला गांजाचा मोठा साठा, पोलिसांचा तपास सुरू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा