छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : हॅरिटेज वास्तूचे विद्रुपिकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) इथल्या पिलरवर जाहीरात करणे एका बेकरीला महागात पडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : हॅरिटेज वास्तूचे विद्रुपिकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
SHARES

मुंबईसारख्या शहरात पोस्टरबाजी करून कसे विद्रुपिकरण केले जाते हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेक ठिकाणी राजकीय असोत किंवा व्यवसायिक पोस्टर्स आपल्याला लावलेले पाहायला मिळतात. असाच काहीसा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) इथे घडला आहे. 

गुरुवारी दुपारी एका ट्विटर युझरने SoBo तील एका बेकरीचे पोस्टर्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) इथल्या खांबांवर लावलेले रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. या युझरने फोटो शेअर करत हेही नमूद केले की, हॅरिटेज वास्तूंचे कशा प्रकारे विद्रुपीकरण केले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) इथे लावलेले हे पोस्टर्स एका बेकरीचे आहेत. या बेकरीची जाहीरात करताना त्यावर लिहले होते की, मिसिंग कुकी... इथे लक्ष द्या, तुम्ही ती कुकी आहात जी आमच्या कुलाबा इथल्या नवीन आऊटलेटमधून मिसिंग आहात. आमच्या कॅफेला भेट द्या आणि तुमचे रिवॉर्ड घेऊन जा.  

युझरने हाच फोटो शेअर करून रेल्वे पोलिसांना टॅग केले. रेल्वे संरक्षण दलाने युझरने केलेल्या तक्रारीची दखल घेतली आणि बेक लाइव्हच्या कुलाबा आउटलेटच्या मालकाविरुद्ध रेल्वे कायद्यांतर्गत त्वरीत गुन्हा दाखल केला.

आरपीएफने चौकशी सुरू केली

पोस्टरवर लिहिले होते, ‘मिसिंग कुकी’. "ही हरवलेली कुकी कोणाची आहे, परंतु ती #worldheritagesite इतकी खराब करत आहे आणि म्हणूनच कठोर कारवाई (sic) पात्र आहे."

सीएसएमटी हे जागतिक वारसा स्थळ आहे आणि ते गॉथिक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. ते सध्या रेल्वेकडून पूर्ववत केले जात आहे.

आरपीएफने सांगितले की त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि ही घटना सर्व नागरिकांसाठी एक इशारा आहे. ही कारवाई म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी आमचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या सामूहिक प्रयत्नात योगदान होते.



हेही वाचा

लोअर परेल ट्रेड वर्ल्ड बिल्डिंग लिफ्ट कोसळून 14 जखमी, एफआयआर दाखल

तुमची मुलं मॉलच्या गेमिंग झोनला जातात? Infinity Mall मध्ये घडला धक्कादायक प्रकार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा