पनवेलमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्या एका युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पनवेलमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार
SHARES

पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्या एका युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरूवारी मध्यरात्री ही घटना घडली.

पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशंयीत आणि हाय रिस्क रुग्णांना कोन येथील इंडिया बुल्स येथे क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार घडला. कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आलेल्या २५ वर्षीय युवकाने सेंटरमध्ये नव्याने दाखल झालेल्या ४० वर्षीय महिलेला डॉक्टर असल्याचं भासवलं. तिने अंगदुखी होत असल्याचं सांगताच मालिश देण्याच्या बहाण्याने युवकाने महिलेवर बलात्कार केला.या प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने पनवेल तालुका पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

पोलिसांनाी याबाबत याप्रकरणी कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असून आरोपी युवक हा कोरोनाबाधित असल्याने त्यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळत आहे. याप्रकरणी पनवेल पोलिस अधिक तपास करीत आहेत.



हेही वाचा -

अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा

महापालिकेनं अखेर नाल्यावरील 'तो' फलक हटवला



  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा