टोलनाका कर्मचाऱ्यांचं गैरवर्तन

 Dahisar
टोलनाका कर्मचाऱ्यांचं गैरवर्तन
टोलनाका कर्मचाऱ्यांचं गैरवर्तन
टोलनाका कर्मचाऱ्यांचं गैरवर्तन
See all

दहिसर - येथील टोलनाक्यावर एका महिलेबरोबर गैरवर्तन झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ही महिला आपल्या पतीसोबत गाडीनं बोरीवलीच्या दिशेनं येत होती. टोलनाक्यावर पैसे देण्यासाठी म्हणून महिलेनं हात गाडीतून बाहेर काढला तोच, त्या महिलेच्या हातावर टोलनाक्यावरील एका तरुणानं हात मारला. त्यानंतर महिला आणि टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात वाद झाला. महिलेला कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचंही समोर आलंय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या दरम्यान त्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांनाही धमकावण्यास सुरुवात केली. सर्व प्रकार घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी झाल्या प्रकाराची चौकशी केली.

Loading Comments