लोकलखाली उडी मारून महिलेची आत्महत्या


लोकलखाली उडी मारून महिलेची आत्महत्या
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली स्थानकात बुधवारी एका महिलेनं उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र, या महिलेची ओळख पटलेली नसून बोरिवली जीआरपी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.


काय घडलं?

बोरिवली जीआरपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी या महिलेनं कांदिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर बोरिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली. घटनेनंतर महिलेचा मृतदेह एका स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. या महिलेनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजलेलं नसून बोरिवली रेल्वे पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास बोरिवली रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन बोरीवली जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी केलं आहे.



हेही वाचा -

वृद्धांना फसवणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

तरूणीने २४ तासांत लावला मोबाइल चोराचा छडा!




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा