तरूणीने २४ तासांत लावला मोबाइल चोराचा छडा!

मोबाइलचं लोकेशन तपासल्यावर आरोपीने मोबाइलमधील रेल्वेच्या अॅपने ६ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता दादर ते तिरुवण्णामलई असं पाँडिचेरी एक्प्रेसचं तिकिट बुक केल्याचं तिला दिसलं. त्यामुळे आरोपी अलगत झीनतच्या जाळ्यात अडकला.

तरूणीने २४ तासांत लावला मोबाइल चोराचा छडा!
SHARES

मोबाइल चोरीला गेला की तो पुन्हा मिळण्याची शक्यता तशी कमीच. त्यामुळेच अनेकजण मोबाइल हरवला की तो शोधण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पण अंधेरीत राहणारी १९ वर्षीय झीनत हक मात्र याला अपवादच म्हणावी लागेल. कारण मोबाइल चोरीला गेल्याने बैचेन झालेल्या झीनतने डोकं लढवून अवघ्या २४ तासांत तो पुन्हा मिळवला. एवढंच नाही, तर मोबाइल चोरालाही पोलिसांच्या सापळ्यात अडकवलं. झीनतची ही डोकॅलिटी पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. या मोबाइल चोराचं नाव सिल्वराम शेट्टी असं असून दादर रेल्वे पोलिसांनी त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.


कसा चोरला मोबाइल?

अंधेरीच्या विजयनगर परिसरात राहणारी झीनत अंधेरी पूर्वेला कामाला आहे. कामावरून घरी परतताना गर्दीचा फायदा घेऊन ५ आॅगस्ट रोजी तिचा मोबाइल चोराने पळवला. घरी आल्यानंतर ही बाब झीनतच्या लक्षात आली. मोबाइलमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी असून मोबाइल जीमेल अकाऊंटशी कनेक्ट असल्याचं तिच्या लक्षात आलं.


चालवलं डोकं

त्यामुळे क्षणाचाही वेळ न दवडता झीनतने घरातील कम्प्युटरहून तिने तिचं जीमेल, फेसबुक अकाऊंट तपासलं. त्यावेळी आरोपीने दोन्ही अकाऊंट डिलिट न करता सुरूच ठेवल्याचं तिला कळलं. त्यानंतर लोकेशन ट्रेस अॅपने मोबाइलचं लोकेशन तपासल्यावर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास चोर मालाड डी मार्ट परिसरात असल्याचं दिसलं. रात्र खूप झाली असल्याने झीनत दुसऱ्या दिवशी जाऊन मोबाइल चोरीची तक्रार नोंदवणार होती.


पाँडिचेरीला जाण्याचा प्रयत्न

पण त्याअगोदर तिने पुन्हा मोबाइलचं लोकेशन तपासल्यावर आरोपीने मोबाइलमधील रेल्वेच्या अॅपने ६ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता दादर ते तिरुवण्णामलई असं पाँडिचेरी एक्प्रेसचं तिकिट बुक केल्याचं तिला दिसलं. त्यामुळे आरोपी अलगत झीनतच्या जाळ्यात अडकला.


पोलिसांची मदत

त्यानंतर बुकींग केलेल्या आरक्षित तिकिटाचा नंबर घेऊन झीनत ६ आॅगस्टच्या रात्री दादर पोलिसांकडे गेली. त्यानंतर दादर पोलिसांच्या मदतीने तिने आरोपी सिल्वराम शेट्टी (३२) याला अलगद पकडलं. पोलिसांनी सिल्वारामकडून चोरीचा मोबाइल हस्तगत करत झीनतच्या हवाली केला. झीनतने दाखवलेल्या हुशारीचं पोलिसांनी कौतुक केलं.



हेही वाचा-

ट्रेनमध्ये किकी चॅलेंज अंगलट, न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा

घाटकोपर बॉम्ब स्फोटातील फरार आरोपीला १६ वर्षांनंतर अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा