वृद्धांना फसवणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

डोंबिवलीतील कोपरगावमध्ये राहणारा राजेश मुंबईतल्या मंदीर परिसरात पहाटे किंवा सायंकाळी ७ वाजता कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी उभा रहायचा. यावेळी कोणी वृद्ध महिला मंदिरात निघाली असल्यास तिला अडवून पुढे हत्या झाली असल्याचे सांगत स्वत:ची ओळख पोलिस अशी करून द्यायचा.

वृद्धांना फसवणाऱ्या तोतया पोलिसाला अटक
SHARES

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांना लुटणाऱ्या टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात गुन्हे शाखा १ च्या पोलिसांना यश आलं आहे. राजेश सापजी बापर्डेकर (४१) असं या आरोपीचं नाव आहे. राजेशवर मुंबईच्या विविध पोलिस ठाण्यास १० हून अधिक गुन्ह्यांची नोंद असून जामिनावर सुटल्यावर तो पुन्हा चोऱ्या करत असल्याचं पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितलं.


मंदीर परिसरात लुटायचा

डोंबिवलीतील कोपरगावमध्ये राहणारा राजेश मुंबईतल्या मंदीर परिसरात पहाटे किंवा सायंकाळी ७ वाजता कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी उभा रहायचा. यावेळी कोणी वृद्ध महिला मंदिरात निघाली असल्यास तिला अडवून पुढे हत्या झाली असल्याचे सांगत स्वत:ची ओळख पोलिस अशी करून द्यायचा. त्यानंतर तुम्हालाही अशा प्रकारे लुटतील असं सांगून गळ्यातील दागिने तो काढून घ्यायचा.  ते दागिने रुमाल किंवा कागदात बांधून देण्याच्या नावाखाली हातचलाखीने तो काढून घ्यायचा. ऩुकतंच त्याने अशा प्रकारे विक्रोळी, भायखळा, कुर्ला, शिवाजी पार्क, दादर, कांदिवली, मालवणी या ठिकाण चोरी केली होती. या गुन्हयांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिसांनी अारोपींच्या मागावर होते.


१३ अाॅगस्टपर्यंत कोठडी 

शनिवारी सेंट जाॅर्ज रुग्णालय परिसरात अशा प्रकारे पोलिसांचं नाव सांगून वृद्धांना गंडवणारा सराईत आरोपी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा १ च्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजेशला अटक केली. राजेशजवळून पोलिसांनी ४८.८ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. विविध गुन्ह्यात राजेशला अटक केल्यानंतर तो जामीनावर सुटायचा आणि पुन्हा चोऱ्या करायचा. एका गुन्ह्यात राजेश न्यायालयात हजरच रहात नसल्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्याला १३ अाॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा -

तरूणीने २४ तासांत लावला मोबाइल चोराचा छडा!

ट्रेनमध्ये किकी चॅलेंज अंगलट, न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा