हुंड्यासाठी सुनेची हत्या

 Mumbai
हुंड्यासाठी सुनेची हत्या

संजय गांधी नगर - सुनेने माहेरुन हुंडा न आणल्याने सासरच्या मंडळीने तिची गळा आवळून हत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री धारावी परिसरात घडली. याबाबत सायन पोलिसांनी शनिवारी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. सुनिता गुप्ता (२३) असे या मयत तरुणीचे नाव असून ती सायनच्या संजय गांधी नगरमध्ये पतीसोबत राहत होती. गेल्या अनेक दिवसांपासून हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून तिचा छळ सुरु होता. दरम्यान शुक्रवारी रात्री तिचा गळा आवळल्यानंतर शेजाऱ्यांनी तिला सायन रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याबाबत सुनिताच्या वडीलांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस सासरच्या मंडळींचा शोध घेत आहेत.

Loading Comments