एक किलो सोनं घेऊन कर्मचारी फरार

 Goregaon
एक किलो सोनं घेऊन कर्मचारी फरार

गोरेगाव - गोल्ड ज्वेलरी शॉपमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने 1 किलो सोनं घेऊन पळ काढला. अनीस यादव असं या आरोपीचं नाव असून तो बिहारचा आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर एका टीमला आरोपीला पकडण्यासाठी बिहारमध्ये पाठवण्यात आलं. या दुकानात आणखी 10 मुलं काम करतात, जी दुकानातून सोनं घेऊन येतात आणि आणलेल्या सोन्याला हॉलमार्क देऊन त्याचं सर्टिफिकेट दुकानामध्ये देतात.

20 मार्चला या दुकानातून अनीस यादवने (24) गोरेगाव आणि मालाडमधील 8 दुकानांतील सोनं जमा केलं आणि पळ काढला. दुकानदाराने त्याला गोरेगाव पूर्वमधील एका दुकानात जायला सांगितलं. पण तो तिकडे न जाता त्याने आपला मोबाईल बंद केला. त्यानंतर दुकानदार सुनील भंडारी यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केलाय. तपासासाठी एक पोलीस दल बिहारला रवाना झाल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

Loading Comments