येस बॅक प्रकरणः कॉक्स अॅड किंग्सचा माजी सीएफओ व ऑडीटरला ईडीकडून अटक

न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. याबाबत ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मालवर्न ट्रॅव्हल्स लि.युके यांचे ४९३ कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे.

येस बॅक प्रकरणः कॉक्स अॅड किंग्सचा माजी सीएफओ व ऑडीटरला ईडीकडून अटक
SHARES

येस बँकेच्या ३६४२ कोटींच्या थकीत कर्जाप्रकरणी आंतरराष्ट्रीय टूर्स अॅड ट्रॅव्हल्स कंपनी कॉक्स अँड किंग्सचा माजी मुख्य वित्तीय अधिकारी(सीएफओ) व अंतर्गत ऑडिटर या दोघांना सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) अटक केली. मनी लाॅडरीगप्रकरणी ही अटक करण्यात आली असून यापूर्वी याप्रकरणी आरोपींशी संबंधी ठिकाणांवर ईडीने शोध मोहिम राबवली होती.

हेही वाचाः- नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २६७ रुग्ण

माजी सीएफओ अनिल खंडेलवाल व अंतर्गत ऑडीटर नरेश जैन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. याबाबत ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मालवर्न ट्रॅव्हल्स लि.युके यांचे ४९३ कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. त्यासाठी आरबीएस बँक, युके, स्टेट बँक ऑफ इंडिया, युके यांची बनावट बँक स्टेटमेंट जमा करण्यात आली होती. याशिवाय ऑडीटरचेही बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. त्याच्या सहाय्याने येस बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते. काॅग्स अँड किंग्स या कंपनीचेही त्यांच्या परदेशी सहाय्यकांचे बनावट बॅलेन्सशीट सादर केले. त्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली. त्यासाठी बनावट ग्राहक दाखवण्यात आले. कंपनीने कर्ज थकवल्यानंतर फॉरेन्सिक ऑडीट करण्यासाठी व्यवस्थापनाने मदत केली नाही.

हेही वाचाः- कल्याण डोंबिवलीत नवीन ३२८ कोरोना रुग्णांची नोंद

 त्यावेळी मिळालेल्या मर्यादीत माहितीच्या आधारे फॉरेन्सिक ऑडीट करण्यात आले. त्यात कंपनीने दाखवलेली ३९०८ कोटींची विक्रीची रक्कम ही वाढवून दाखवण्यात आली होती. त्यासाठी १५ बोगस ग्राहकांचा वापर करण्यात आला होता. त्यातील बहुसंख्या विक्री ही कंपनीची सहाय्यक कंपनी ईझीगच्या लेजरमध्ये दाखवण्यात आला होता. पण हा व्यवहार कंपनीच्या बँक स्टेटमेंटमध्ये नव्हता. आणखी १४७ ग्राहक बनावट असल्याचा ईडीचा संशय आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा