तरुणाला बाथरूममध्ये बांधून लुटले, तिघांना अटक

रुग्णवाहिकेच्या सेवेतून मिळणारी रक्कम तक्रारदाराकडे जमा व्हायची. ही रक्कम मोठी असल्याचे माहित असल्यानेच या तिघांनी कट रचून हा गुन्हा केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.

तरुणाला बाथरूममध्ये बांधून लुटले, तिघांना अटक
SHARES

गोरेगाव येथे राजकीय पक्षाने नागरिकांसाठी उभारलेल्या कोविड रुग्णवाहिकेबाहेर बसलेल्या व्यक्तीला महिलेच्या मदतीने बांधून लुटण्यात आल्याचा प्रकार घडला होता. गाडी बंद पडली असून मदतीसाठी महिलेने तक्रारदाराला बोलण्यात गुंतववले. तेवढ्यात इतर आरोपींनी हात,पाय, तोंड बांधून तक्रारदाराच्या खिशातून ७० हजार चोरून पळ काढला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने १ महिला आरोपी आणि २ पुरूषांना अटक केली आहे.

हेही वाचाः- चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवालाच्या पत्नीला ड्रग्सप्रकरणात अटक

तक्रारदार राम चौधरी व्यवसायाने चालक असून गोरेगाव येथील जव्हार नगर येथील रहिवासी आहेत. गुरूवारी रात्री ते परिसरातील एका राजकीय पक्षाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या कोविड रुग्णवाहिके बाहेर बसले होते. त्यावेळी एक गाडी तेथे थांबली. त्यातून एक महिला व तीन पुरूष बाहेर पडले. आमची गाडी बंद पडली असल्याचे सांगून महिलेले चौधरी यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर आपल्याचा शौचालयात जायचे असल्याचे चौधरी यांना सांगितले. त्यांनी तेथील शौचालयात महिलेला नेले. त्यावेळी शौचालयाची लाईट गेली असल्याचे कारण सांगून तिने चौधरी यांना शौचालयात बोलावले. जसे चौधरी शौचालयात शिरले. तसे त्यांच्या मागून महिलेसोबतचे तीन व्यक्तीही शिरले. त्यांनी चौधरी यांचे हात पाय बांधून त्यांच्याकडील रोखीसह  ७० हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला व तेथून पळ काढला. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९२(जबरी चोरी) व ३४(सामायिक गुन्हेगारी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ९९८ नवे रुग्ण, २३ जणांचा दिवसभरात मृत्यू

त्यानुसार गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने यांच्या पथकाने तपास सुरू केला.  या गुन्ह्यात पोलिसांनी सुलताना शेख, मिथिल परमार, सोहेल अब्दुल रेहमान मेत्तर या तिघांना नालासोपारा येथून अटक केली. यातील एक आरोपी हा याच रुग्णवाहिकांवर चालक म्हणून काम करायचा. रुग्णवाहिकेच्या सेवेतून मिळणारी रक्कम तक्रारदाराकडे जमा व्हायची. ही रक्कम मोठी असल्याचे माहित असल्यानेच या तिघांनी कट रचून हा गुन्हा केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा