मुलांची स्टंटबाजी, पालकांची डोकेदुखी

मुंबई - लोकलच्या दरवाजावर, टपावर होणारी स्टंटबाजी तुमच्यापैकी अनेकांनी पाहिली असेल. लोकलच्या डोअरवर स्टंटबाजी करत असलेल्या या मुलांना पाहा. यांना पाहून आपली मुलं तर असं करत नाहीत ना? अशी भीती तुम्हाला वाटत असेल. भीती वाटणं साहजिकच आहे. कारण असा स्टंट कोणत्याही क्षणी जिवावर बेतू शकतो. मात्र या सगळ्याला काही वैज्ञानिक कारणं आहेत.

वाढत्या वयात इतरांपेक्षा काही वेगळं करण्याच्या नादात ही मुलं अशी कृत्य करतात, असं मानसोपचारतज्ज्ञांचं मत आहे. वांद्रे आणि माहीमदरम्यानच्या रेल्वे प्रवासात शाळकरी मुलं जे काही करत आहेत ते अंगावर काटा आणणारं आहे. मात्र याबाबत पालक आणि प्रवाशांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

Loading Comments