अंगठीवरुन झाली हाणामारी

 Chembur
अंगठीवरुन झाली हाणामारी

टिळकनगर - हाताच्या बोटातील अंगठी घालण्यासाठी दिली नाही, या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना बुधवारी चेंबूरच्या जनता परिसरात घडली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. दरम्यान इतर आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय खैरे यांनी दिली.

Loading Comments