ज्या रुग्णालयाच्या परिचारिकेशी जुळले होते लग्न, त्याच रुग्णालयात झाला तरुणाचा मृत्यू


ज्या रुग्णालयाच्या परिचारिकेशी जुळले होते लग्न, त्याच रुग्णालयात झाला तरुणाचा मृत्यू
SHARES

तरुणाची हत्या केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी पाच जणांविरोधात हत्या, दंगल पसरवणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. सहाबुद्दीन सरफुद्दीन खान आलस सुन्नी (25), सचिन मोदक (23) रामभवन श्रीराम यादव (28), दस्तगीर आलस मेहबूब नाशिम शेख (24), पंकज भैयाराज सेडाने (34) अशी या अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. या पाचही आरोपींवर नितेश पटेल (30) आणि केलाश अंगार (28) यांच्यावर जिवघेणा वार केल्याचा आरोप आहे. सध्या या पाचही जणांना न्यायालयिन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नितेशचे लग्न चारकोपच्या गणेश नगरमधील ऑस्कर रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत असलेल्या मोनिकाशी होणार होते. मोनिकाला भेटण्यासाठी नितेश रविवारी रात्री कैलाशसोबत ऑस्कर रुग्णालयात आला होता. मोनिकाशी भेटल्यानंतर जेव्हा तो निघाला तेव्हा बाहेर उभी असलेल्या रुग्णवाहिकेचा चालक प्रफुल्लशी नितेशचे मोनिकावरून वाद सुरू झाले. प्रफुल्ल आणि नितेश यांच्यात वाद सुरू असताना रुग्णवाहिकेचा मालक पंकज आणि त्याचे तीन मित्र शनी, भुवन आणि मेहबूब देखील तिकडे आले. त्यावेळी नितेश आणि कैलाशला मारहाण केल्याचा आरोप या तिघांवर आहे. मारहाण केल्यानंतर त्या दोघांना तिथेच फेकून पळून गेले.

ऑस्कर रुग्णालयाचे संचालक डॉ. सतीश यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या नितेश आणि कैलाशला उपरासाठी रुग्णालयात दाखल केले. पण सोमवारी रात्री कोमात ठेवलेल्या नितेशचा मृत्यू झाला. चारकोप पोलिसांनी आरोपींविरोधात प्रथम भादंवि कलम 141,143, 147, 324, 342 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला होता. पण नितेशच्या मृत्यूनंतर भादंवि कलम 304 अंतर्गतही गुन्हा दाखल केला. या सर्व आरोपींना मंगळवारी बोरिवली कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा