मनोरूग्णाला चिडवल्यावरून तरूणाची हत्या


SHARE

लालबागच्या प्रसिद्ध अशा रंगारी बदक चाळीत मनोरूग्णाला चिडवल्याच्या रागातून एका तरूणाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी जगदीश पडवळ (४२) आणि त्याचा भाऊ विजय पडवळ (४३) या दोघांनाही अटक केली आहे.


मनोरूग्णाची करायचे मस्करी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगारी बदक चाळीत राहणाऱ्या एका मनोरूग्णाला चाळीत राहाणारे अनेक जण चिडवत असत. या मनोरूग्णाच्या दोन्ही भावांनी अनेकदा समजावून देखील चिडवण्याचे प्रकार काही थांबत नव्हते. या चिडवणाऱ्यांमध्ये चाळीत रहाणारा वैभव जाधव(२४) देखील होता. वैभवला विजय आणि त्याच्या भावाने अनेकदा समजावून देखील तो ऐकत नव्हता. याआधी देखील या दोघांमध्ये अनेक वादही झाले होते.


डोक्यात घातला लोखंडी बांबू

बुधवारी रात्री वैभवने पुन्हा एकदा या ४६ वर्षीय मनोरूग्णाची मस्करी केली. त्याच्या भावांनी जाब विचारला असता वैभव त्यांच्याशी वाद घालू लागला. दोघांमध्ये वाद एवढा वाढला की रागाच्या भरात जगदीशने खाली पडलेला बांबू उचलून वैभवच्या डोक्यात मारला. हा वार एवढा जबर होता कि रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वैभवचा मृत्यू झाला.

वैभवला मारहाण केल्यानंतर दोन्ही भावांनी पळ काढला होता. या प्रकरणी आधी विजय पडवळला आणि त्यानंतर नालासोपाऱ्यावरून जगदीशला अटक केल्याची माहिती काळाचौकी पोलिसांनी दिली आहे.हेही वाचा

सरदारजींनी केले ट्रॅफिक पोलिसाला नामोहरम! व्हिडिओ व्हायरल!


संबंधित विषय
ताज्या बातम्या