COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

सरदारजींनी केले ट्रॅफिक पोलिसाला नामोहरम! व्हिडिओ व्हायरल!


सरदारजींनी केले ट्रॅफिक पोलिसाला नामोहरम! व्हिडिओ व्हायरल!
SHARES

पोलिसांचं भय कमी होत चाललंय की काय? असा प्रश्न पडावा अशा अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. अशीच एक घटना मुलुंडच्या एन.एस. रोडवर घडली. एका सरदारजीने चक्क त्याची टो केलेली बाईक टोईंग व्हॅनवर चढून स्वत:च उतरवून घेतली. एवढंच नाही, तर व्हॅनवरचा क्लॅम्पही तोडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान, सरदारजींनी घातलेल्या या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.


एन. एस. रोडवर अर्धा तास तमाशा!

हा प्रकार आहे मुलुंडच्या एन. एस. रोडवरचा. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमाराला सरपंच सिंग या महाशयांनी भर रस्त्यात नो पार्किंगमध्ये आपली अॅक्टिव्हा मोठ्या राजेशाही थाटात उभी केली. बरं, गाडी उभी केली तर केली, वर गाडीजवळ न थांबता हे सद्गृहस्थ भलतीकडेच गायब झाले! शेवटी व्हायचं ते झालंच!नेहमीप्रमाणे एन. एस. रोडवरून टोईंग व्हॅन जात असताना सरपंच सिंग यांच्या अॅक्टिव्हावर टोईंग कर्मचाऱ्यांची नजर पडली आणि त्यांनी ती उचलली. वाहतूक पोलिस हवालदार मनोज पवार यांनी आवश्यक ती कागदोपत्री नोंद करून निघण्याची तयारी केली. पण तितक्यात सरपंच सिंग यांनी राणा भीमदेवी थाटात घटनास्थळी एंट्री केली!


..आणि टोईंग व्हॅनवर चढले सरदारजी!

आपली बाईक पोलिसांनी उचललीच कशी अशा प्रकारचा वाद ते थेट पोलिसांशीच घालू लागले! पोलिसांनी स्वत:च सदर महाशयांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण शून्य! सरपंच सिंग तर काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. पोलिसांशी हुज्जत घालून ते थांबले नाहीत. तर त्यांनी थेट टोईंग व्हॅनकडे मोर्चा वळवला!पोलिस विनवतायत, सरदारजी सुनावतायत!

आता पोलिसांची पंचाईत झाली! हे महाशय थेट टोईंग व्हॅनवर चढले आणि त्यांनी त्यांची बाईक खाली उतरवायला सुरुवात केली. बाजूला उभे पोलिस हवालदार मनोज पवार हातात काहीच न राहिल्यामुळे खिशातला मोबाईल काढून हा सर्व नाट्यमय प्रकार मोबाईलमध्ये शुट करत होते. आणि दुसरीकडे सरपंच सिंग यांना खाली उतरण्यास सांगत होते. 'असं करू नका, नाहीतर तुमच्याच बाईकचं नुकसान होईल' असंही ते विनवत होते. पण सिंग महाशय मात्र ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते.


जोश में होश खो बैठे सरदारजी!

अखेर शक्य ते सर्व प्रयत्न करून सरपंच सिंग यांनी आपली बाईक खाली उतरवलीच! या सगळ्या गलबल्यात सिंग महाशयांनी टोईंग व्हॅनची क्लॅम्पही तोडून टाकली. जोश में होश खो बैठे सरदारजी!

आपला व्हिडिओ काढला जात आहे हे माहित असूनही सरदारजी मात्र त्यांच्या पवित्र्यावर ठाम होते. त्यांनी थेट वाहतूक पोलिसालाच धमकी दिल्याचंही या व्हिडिओमध्ये कैद झालं आहे. अखेर अर्ध्या तासाचा राडा केल्यानंतर आपली अॅक्टिव्हा घेऊन सरदारजींची स्वारी घटनास्थळावरून रवाना झाली.अखेर गुन्हा झाला नोंद

अब पुलिस से खिंचातानी करोगे, तो भुगतना तो पडेगाही! या सगळ्या प्रकाराविरोधात वाहतूक पोलीस हवालदार मनोज पवार यांच्या फिर्यादीवरून मुलुंड पोलिसांनी कलम ३५३, ५०६ आणि सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. मुलुंड पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.हेही वाचा

बाईक चालकाची दादागिरी, वाहतूक पोलिसाला मारहाण


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा