बाईक चालकाची दादागिरी, वाहतूक पोलिसाला मारहाण


बाईक चालकाची दादागिरी, वाहतूक पोलिसाला मारहाण
SHARES

एकीकडे स्तनपान करणाऱ्या महीलेची गाडी टो केल्यामूळे वाहतूक पोलिसाचे निलंबन केले असताना दुसरीकडे मात्र बाईक चालकाला दाखवलेल्या चांगुलपणामुळे वाहतूक पोलिसाला चक्क मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी नवी मुंबईच्या कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दानीश इब्राहिम शेख (२१) याला अटक करण्यात आली आहे.



का केली मारहाण?

सोमवारी रात्री कोपर खैरणेच्या ब्लू डायमंड सर्कलवर दानीश आपल्या मैत्रिणीसोबत आला. हा रस्ता वन वे असताना दानीशने रस्त्यातच बाईक उभी केली आणि मैत्रिणीशी गप्पा मारत उभा राहिला. त्यामुळे तिथे ट्रॅफिक वाढू लागला.

त्यावेळी तिथे आलेले वाहतूक हवालदार तानाजी पाटील यांनी दानीशला बाईक बाजूला करण्यास सांगितले. मात्र त्याकडे दानीशने साफ दुर्लक्ष केले. शेवटी तानाजी यांनी स्वत: बाईक रस्त्याच्या कडेला लावली. एवढे झाल्यानंतर वाहतूक पोलीस तानाजी पाटील आणि दानीश यांच्यात वाद सुरू झाला आणि रागाच्या भरात दानीशने वाहतूक पोलीस पाटील यांच्या कानाखाली मारली. विशेष म्हणजे ही सगळी घटना एका पादचाऱ्याने आपल्या मोर्बईल कॅमेऱ्यात चित्रित केली असून त्याआधारे दानीशला भा. दं. वि. 353, 332 आणि 504 कलमांत्रगत अटक करण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा