मोबाईल शोधण्याच्या नादात तरुणाला ट्रेनची धडक


मोबाईल शोधण्याच्या नादात तरुणाला ट्रेनची धडक
SHARES

सायन - माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडलेला मोबाईल शोधत असताना अचानक पाठीमागून आलेल्या लोकलने एका तरूणाला जोरदार धडक दिली. यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तन्झील कुरेशी (19) असे या जखमी तरूणाचे नाव आहे.
तन्झील आणि त्याचा मित्र अब्दुल मुनाफ (18) हे दोघे कुर्ला येथील रहिवासी आहेत. दोघेही सीएसटी येथे एका कपड्याच्या दुकानात कामाला आहेत. नेहमीप्रमाणे ते कुर्ला येथून मंगळवारी कामाला निघाले होते. सायन रेल्वे स्थानक सोडल्यानंतर लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या तन्झीलचा मोबाईल हा सायन-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान खाली पडला. यावेळी तन्झीलने याची माहिती अब्दुलला दिली.
त्यानुसार, अब्दुल आणि तन्झील हे दोघे माटुंगा रेल्वे स्थानकात उतरले आणि ट्रॅकवर मोबाईल शोधण्यास निघाले. मोबाईलचा शोध सुरु असताना कुर्ला येथून सीएसटीच्या दिशेने एक लोकल निघाली. मात्र मोबाईल शोधण्यात मग्न असलेल्या तन्झीलला पाठीमागून आलेली ट्रेन समजली नाही आणि यात त्याचा अपघात झाला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा