पैशाच्या वादातून तरूणाची हत्या

 Govandi
पैशाच्या वादातून तरूणाची हत्या

मानखूर्द - पैशाच्या वादातून मानखुर्द मंडाळा परिसरात मोहम्मद अली (२५) या तरुणाची शनिवारी हत्या करण्यात आलीय. इक्बाल शेख (५१) या आरोपीसोबत त्याचे पैशावरुन भांडण झालं होतं. याच वादातून आरोपीनं मोहम्मदला मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला रविवारी अटक केलीय.

Loading Comments