गोवंडीत तरुणाची हत्या

 Govandi
गोवंडीत तरुणाची हत्या

गोवंडी - बैंगनवाडी परिसरात बुधवारी पहाटे 3 वाजता एकाची हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलंय. मोहमद कांडी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Loading Comments