ड्रॉवर बनवला नाही म्हणून डोक्यात हातोडा घालून तरूणाची हत्या


ड्रॉवर बनवला नाही म्हणून डोक्यात हातोडा घालून तरूणाची हत्या
SHARES

मुंबईच्या वांद्रे परिसरात एका २५ वर्षीय तरुणाची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी छोटेलाल सहानी (३४) आणि त्याचा भाऊ राकेश सहानी या दोघांना अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर पवार (२५) आणि सहानी बंधू हे एकाच इमारतीत राहातात. सुधीर पवार हा छोटी मोठी काम करत असे, तर सहानी बंधू हे कार्पेन्टर होते. सुधीर पवार याने छोटेलाल सहानीला एक ड्रॉवर बनवण्यासाठी दिला होता. मात्र, महिना उलटून गेला, तरी त्याने काही तो ड्रॉवर बनवला नव्हता.

मंगळवारी दारूच्या नशेत सुधीरने छोटेलालला ड्रॉवर विषयी विचारले आणि शिवीगाळ केली. तसेच त्याला बांबूने देखील मारले. आपल्या भावाला सुधीर मारतोय, हे बघून छोटेलालचा भाऊ राकेश देखील मध्ये पडला. दोन्ही भावांनी मिळून सुधीरला बेदम मारलं, एवढं कि सुधीर तिथेच कोसळला. त्याला तात्काळ भाभा रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे दुसऱ्या दिवशी उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी सुधीरच्या डोक्यात हातोडा मारण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या प्रकरणी आम्ही दोन्ही भावांना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने दोघांना १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.



हेही वाचा

चायनीज नीट न झाल्याचा जाब विचारला, 'त्याने' उकळतं तेल अंगावर फेकलं!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा