Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २० जुलैरोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
SHARES

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २० जुलैरोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. दरवेळेस मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला या महापुजेचा मान मिळतो. मात्र यंदा वारीच नसल्यानं हा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे वर्धा येथील केशव शिवदास कोलते यांना हा मान मिळाला होता.

पहाटे २.१५ वाजल्यापासून या महापुजेला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे यांच्या समवेत वर्धा येथील केशव शिवदास कोलते व त्यांची पत्नी इंदूबाई केशव कोलते यांना यंदा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला.

या महापुजेला मुख्यमंत्र्यांसोबतच सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. तसेच पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील यावेळी मंदिरात हजर होते. आषाढी एकादशीच्या महापूजेनिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर उजळून निघाले होते.

यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज ओसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर). ह. भ. प. प्रकाश नवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, सदस्य, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद व अन्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा