अण्णा भाऊ साठे नाट्यगृह होणार अत्याधुनिक

  Mazagaon
  अण्णा भाऊ साठे नाट्यगृह होणार अत्याधुनिक
  मुंबई  -  

  भायखळा - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील तीन दशकांपासून बंद असलेल्या अण्णा भाऊ साठे खुल्या नाट्यगृहाचा विकास केला जाणार आहे. इथे प्रशस्त आणि बंदीस्त असं तब्बल 780 आसनक्षमतेचं अत्याधुनिक नाट्यगृह उभं राहणार आहे. यासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करण्यात येतील.

  खुल्या नाट्यगृहातील आवाजामुळे राणीबागेतील प्राण्यांना त्रास होत असल्यामुळे हे सभागृह अनेक वर्षांपासून बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र आता राणीबागेच्या विकासाचं कामं सुरू झाल्यामुळे रखडलेल्या अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाच्या पुनर्विकासाच्या कामालाही गती मिळाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असून अनेक वर्षांपासूनची मागणी त्यामुळे पूर्ण होणार आहे.
  राणीबागेच्या सर्वंकष विकासामध्ये अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाच्या विकास कामाचाही समावेश असल्यामुळे टप्प्या-टप्प्याने विकास करत या नाट्यगृहाच्या फेरविकासाचं काम हाती घेण्यात आलं आहे. या फेरविकास आराखड्याला मुंबई संस्कृती वारसा जतन समिती आणि इमारत प्रस्ताव विभागानंही परवानगी दिली असून त्यानुसार कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. हा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.