'सेंट थॉमस कॅथिड्रल चर्च'ची ३०० वर्ष!

चर्चच्या रचनेला ३०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. चर्चचे मुख्य व्यवस्थापक अविनाश रंगाय्या हे मार्गदर्शन करणार आहेत. या हेरिटेज वॉकमध्ये तुम्हाला चर्चशी संबंधित एकूण एक माहिती मिळणार आहे. चर्चची रचना कशी केली? कुणी केली? चर्चमधल्या खिडक्यांच्या काचांवर रंगवलेले चित्र अशीच सर्व माहिती या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

  • 'सेंट थॉमस कॅथिड्रल चर्च'ची ३०० वर्ष!
  • 'सेंट थॉमस कॅथिड्रल चर्च'ची ३०० वर्ष!
  • 'सेंट थॉमस कॅथिड्रल चर्च'ची ३०० वर्ष!
  • 'सेंट थॉमस कॅथिड्रल चर्च'ची ३०० वर्ष!
SHARE

जगात फारच थोड्या ठिकाणी दिसणारा सर्वधर्म समभाव मुंबईत अगदी पुरातन काळापासूनच दिसतो. त्याचेच उदाहरण द्यायचे झाले, तर मुंबईत आज प्रत्येक धर्माची प्रार्थनास्थळं आहेत. आजही त्या ठिकाणी प्रार्थना होतात आणि त्या त्या धर्माची मंडळी त्या प्रार्थना स्थळांचे पावित्र्य जपून आहेत. इथलं प्रत्येक प्रार्थनास्थळ सौंदर्यपूर्ण वास्तूरचनेचं एक उत्तम उदाहरण आहे. या प्रत्येक वास्तूला स्वत:चा इतिहासही आहे, जो मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. मुंबईतल्या अशाच एका ऐतिहासिक चर्चच्या रचनेला ३०० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने 'सेंट थॉमस कॅथिड्रल चर्च'मध्ये हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आलं आहे.चर्चची आकर्षक रचना

'सेंट थॉमस कॅथिड्रल चर्च' हे मुंबईतलं पहिलंच अँग्लिकन चर्च आहे. चर्चगेट स्थानकाचं नाव याच चर्चवरून पडलं आहे. या चर्चच्या, बायबलमधील घटनांवर आधारित चित्रांनी रंगवलेल्या खिडक्यांच्या काचा हा इतिहासकारांच्या कौतुकाचा विषय आहे. तसंच या चर्चची उंची १५ फूट आहे. चर्चच्या याच रचनेला ३०० वर्ष पूर्ण झाली आहेत.'इस्ट इंडिया कंपनी'चे पहिले गवर्नर सरजॉन ऑक्सिडन यांना १६६८ साली फोर्ट परिसरात चर्च उभारण्याची संकल्पना सुचली. त्यानुसार १६७६ साली या चर्चची पायाभरणी करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष बांधकाम १७१८ साली पूर्ण झाले. जवळपास ३० वर्ष या चर्चचं काम पडून होतं. पण या कामाचं युनेस्कोने पारितोषिक देऊन कौतुक केलं आहे.हेरिटेज वॉक

चर्चच्या रचनेला ३०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. चर्चचे मुख्य व्यवस्थापक अविनाश रंगाय्या हे मार्गदर्शन करणार आहेत. या हेरिटेज वॉकमध्ये तुम्हाला चर्चशी संबंधित एकूण एक माहिती मिळणार आहे. चर्चची रचना कशी केली? कुणी केली? चर्चमधल्या खिडक्यांच्या काचांवर रंगवलेले चित्र अशीच सर्व माहिती या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला ३०० रुपये मोजावे लागतील.कधी- २१ एप्रिल, सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत

मेल आयडी - cathedralwalks@gmail.com
हेही वाचा

मुंबईतील हेरिटेज इमारतींची माहिती 'क्यू आर कोड'वर


संबंधित विषय
ताज्या बातम्या