SHARE

जोगेश्वरी - जोगेश्वरी पूर्व येथील बांद्रेकरवाडी मित्र मंडळ संचालित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने 'मागोवा' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री.समर्थ विद्यालयात हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाद्वारे बक्षिस वितरण, पदाधिकारींचा सन्मान, गणेश हिरवे सोशल ग्रुपचा सत्कार इत्यादी कार्यक्रम पार पाडण्यात आले. गणेश हिरवे यांच्या वतीने राबवण्यात आलेला एक वही, एक पेन हा उपक्रम राबवण्यात आला होता. उपक्रमात जमा झालेले वही,पेन हे जव्हार येथील आश्रम शाळेतील विद्यार्थांना देण्यात येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या