Advertisement

डॉ. आंबेडकर पुस्तकाचं नव्यानं प्रकाशन


डॉ. आंबेडकर पुस्तकाचं नव्यानं प्रकाशन
SHARES

कालिना - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती निमित्तानं तानाजी बाळाजी खरावतेकर लिखित 'डॉ. आंबेडकर' या कराचीतून प्रसिद्ध झालेल्या चरित्राचं नव्यानं प्रकाशन बुधवारी करण्यात आलं. फिरोजशहा मेहता भवन, कालिना, विद्यानगरी येथे हा कार्यक्रम झाला. हे पुस्तक 1946मध्ये कराचीहून मराठी भाषेत प्रसिद्ध झालं होतं. या पुस्तकाचं नव्यानं प्रकाशन जेष्ठ विचारवंत लेखक आणि आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक रावसाहेब कसबे यांच्या हस्ते झालं. या वेळी कुलगुरू डॉ. संजय देशमुखही उपस्थित होते. श्री. सुधींद्र कुलकर्णी, अध्यक्ष, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, डॉ. सुरेंद्र जोंधळे आदीही व्यासपीठावर होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement